शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ- दरेकर

1 min read

शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊ- दरेकर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी, अन्यथा भाजप आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

सोलापूर: अतिवृष्टी मुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कधीही भरुन न येणारं नुकसान झाले आहे. पण अद्याप पंचनामे झालेले नाहीत. किंबहुना पंचनाम्याची सुरुवातही झाली नाही. सरकारने दीर्घकालीन उपाययोजना करावी, पण त्याआधी शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी दरेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

प्रवीण दरेकर आज सोलापूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. त्यावेळी दरेकर यांनी सांगोळगी गावातील परिस्थितीची पाहणी करतानाच, तिथल्या शेतकऱ्यांशीही संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत करावी, अन्यथा भाजप आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.