परभणीत अज्ञात आजाराने कोंबड्या मृत्यूमुखी

प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षणाचे काम सुरू,मृत्यू पावलेल्या पक्ष्यांचे नमुने त्यांनी तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहेत.

परभणीत अज्ञात आजाराने कोंबड्या मृत्यूमुखी

विजय कुलकर्णी/परभणी : तालुक्यातील मुरूंबा आणि शहरातील नारायण चाळ परिसरात शुक्रवारी दिवसभरात अज्ञात आजाराने कोंबड्या मृत्यू पावल्याने मोठी भीती व्यक्त होऊ लागली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मुरूंबा येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गावातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत कुकूट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा, प्रदर्शन तसेच पशुपक्ष्यांच्या अवागमनास दि.८ पासुन प्रतिबंध घातला आहे. याबाबतचे आदेश त्यांनी सायंकाळी जारी केेले आहेत. पशूसंवर्धन विभागाचे पथक मुरूंबा येथे तळ ठोकून आहे. मृत्यू पावलेल्या पक्ष्यांचे नमुने त्यांनी तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहेत.

मात्र, अद्याप मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. बर्ड फ्लूचा धोका सर्वत्र वाढला आहे. हा आजार एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरसव्दारे होतो. बर्ड फ्लूचा धोका वाढू लागल्याने सतर्कतेचा इशाराही संबंधितांकडून देण्यात आला आहे. मुरूंबा गावात आतापर्यंत शेकडो कोंबड्यांसह इतर पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे पशूसंवर्धन विभागाचे एक पथक तेथे तळ ठोकून आहे. हा प्रकार नेमका कशाचा आहे, याबाबत यंत्रणा शोध घेत आहे. त्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. अशोक लोणे, तालुका पशूसंवर्धन अधिकारी डॉ.के.बी.तांबे, डॉ. गिरीश लाटकर यांनी म्हटले आहे. त्यांनी गावास भेट दिली असून पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्यास पशूसंवर्धन विभागास तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहनही केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.