हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडयाची नूतन कार्यकारिणी जाहीर

1 min read

हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडयाची नूतन कार्यकारिणी जाहीर

लातुरचे व्यंकटेश पुरी व हिंगोलीचे पत्रकार महेंद्र पुरी यांच्यावर जबाबदारी.

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा कार्यक्षेत्र संपुर्ण भारत या अधिकृत नोंदणीकृत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ३१ जुलै २०२० रोजी योगसदगुरू तथा हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडयाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.कृष्णदेव गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे राज्य सचिव संदीप गोसावी यांनी संस्थेची नूतन कार्यकारणी जाहीर केली.ज्यामध्ये मराठवाडयातील दोन भुमीपुत्र लातुर चे व्यंकटेश पुरी यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली तर हिंगोली येथील पत्रकार महेंद्र पुरी यांची संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

लातुर चे व्यंकटेश पुरी यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड 

तसेच राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. नुतन पदाधिकारी यांचे संघटनेचे नुतन महाराष्ट्र अध्यक्ष योगसदगुरू डॉ.कृष्णदेव गिरी व संघटनेचे राज्य महामंत्री संदीप गोसावी यांच्यासह समाजबांधवांनी अभिनंदन केले आहे.

हिंगोली येथील पत्रकार महेंद्र पुरी यांची संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष पदी निवड