हिंगोली अँटीजन तपासणी शिबिरात आढळे 19 कोरोना बाधित रुग्ण

1 min read

हिंगोली अँटीजन तपासणी शिबिरात आढळे 19 कोरोना बाधित रुग्ण

इतर 14 रुग्णांचा देखील समावेश

प्रद्युम्न गिरिकर/हिंगोली: जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या   पार्श्वभूमीवर तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये आज दिवसभरात 598 जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील 19 व्यापारी कोरोना  बाधित असल्याचे समोर आले आहे. याव्यतिरिक्त नियमित तपासणीमध्ये 14 रुग्ण बाधित असल्याचे समोर आले असून एकूण दिवसभरात 33 रुग्णांची भर पडली आहे. आज पंधरा रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.
जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सर्व व्यापाऱ्यांची अँटीजन टेस्ट करणे बंधनकारक केले होते. जे व्यापारी ही तपासणी करणार नाहीत त्यांना आपली प्रतिष्ठाने उघडण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील उपविभाग अंतर्गत येणाऱ्या शहर व परिसरामध्ये तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. हिंगोली शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये 391 जणांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये 13 जण बाधित असल्याचे समोर आले. कळमनुरी येथे 69 जणांची तपासणी करण्यात आली ज्यामध्ये चार जण बाधित तर आखाडाबाळापुर येथे 67 जणांची तपासणीत 2 जणांना बाधा  झाल्याचे समोर आले. वसमत येथे 38, सेनगाव येथे 33 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकही व्यवसायिक बाधित नसल्याचे समोर आले आहे. एकूण 598 जणांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये 19 जणांना बाधा झालेली आहे.
याव्यतिरिक्त नियमित तपासणी अंतर्गत जे रुग्ण शासकीय विलगीकरण कक्षात दाखल होते त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यानुसार हिंगोली येथे 5, नरसी  येथील एक, पिंपळखुटा, कोथळज, सेनगाव, कळमनुरी या ठिकाणी प्रत्येकी एक, वसमत येथे दोन व गिरगाव येथे एक असे 14 रुग्ण नव्याने बाधित असल्याचे समोर आले आहे.
याबाबत प्रशासनाकडून अहवाल जारी करण्यात आला असून आज दिवसभरात एकूण 33 रुग्णांना बाधा झाल्याचे समोर आले आहे.