हिंगोली रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

1 min read

हिंगोली रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.

41 रक्तदात्यांनी केले रक्तदान

हिंगोली- सदभाव सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आज रविवारी गांधी चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात एकूण 41 जणांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.
नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नवनियुक्त पोलीस उपविभागीय अधिकारी यतीश देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सय्यद साहेब, बाबू दादा कदम, पप्पू चव्हाण , विलास गोरे आदींच्या उपस्थिती रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
रक्त संकलन पिढीमध्ये रक्ताची कमतरता असल्याने आयोजकांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शहरातील 41 रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदविला. सहभागी रक्तदात्यांना रक्त संकलन पेढीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता सदभाव संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार भरतिया, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रद्युम्न गिरीकर, महेंद्र पुरी, चंद्रकांत वैद्य, विजय गुंडेकर, सुनील पाठक, श्रमिक वृत्तपत्र संघटनेचे राजेंद्र हलवाई, संदीप पाचमासे, रक्त संकलन पेढीचे डॉ. स्वाती नुणेवार, अश्विनी मुंडे, श्रीनिवास निर्मळ, बंडू नरवाडे, आत्माराम जटाळे आदींनी परिश्रम घेतले.