हिंगोली: कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढताच

1 min read

हिंगोली: कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढताच

नव्याने 23 रुग्णांची वाढ, हिंगोली शहराला धोका

प्रद्युम्न गिरीकर: हिंगोली जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसात हिंगोली शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 24 तासात आढळलेल्या 23 रुग्णांपैकी 21 रुग्ण केवळ हिंगोली शहरातील असून एकूण रुग्ण संख्येचा आकडा 556 वर पोहोचला आहे.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये शहरांसह ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यात एकूण 556 कोरणा रुग्ण आढळून आले असून यापैकी 358 जणांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तर 192 रुग्णांवर आज घडीला उपचार सुरू आहेत. अद्याप पर्यंत सहा जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात 23 नवीन रुग्णांची भर पडली असून यापैकी 21 रुग्ण हिंगोली शहरातील तर दोन रुग्ण कलगाव येथे आढळले आहेत. शहरातील रुग्णांपैकी वंजार वाडा भागात 15, आझम कॉलनी भागात 4, राज्य राखीव दलाच्या वसाहतीमध्ये एक व खडकपुरा भागामध्ये एक असे रुग्ण आढळले आहेत. हिंगोली शहरात दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे शहराला कोरोना विषाणूचा विळखा बसल्याचे समोर येत आहे.