हिंगोली जिल्ह्यात 6 ते 19 ऑगस्ट पर्यंत कडक लॉकडाऊन

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

हिंगोली जिल्ह्यात 6 ते 19 ऑगस्ट पर्यंत कडक लॉकडाऊन

प्रद्युम्न गिरिकर /हिंगोली: जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता  6 ते 19 ऑगस्ट दरम्यान कडक लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
गेल्या काही दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आज घडीला जिल्ह्यात रुग्ण संख्या सातशे पार पोहचली आहे. यावर  प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतू  नागरिकांकडून नियमांचे  पालन  केल्या जात नसल्याने संख्या वाढतच  आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी जयवंशी यांनी महत्वाची घोषणा केली आहे.  6 ते 19 ऑगस्ट दरम्यान जिल्हयात संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या दरम्यान आपत्कालीन  व्यवस्थेतील आस्थापने सुरु राहतील. बँक, शासकीय कार्यालय सुरू राहणार आहेत. याचबरोबर संचारबंदीच्या दरम्यान जिल्ह्यातील  बाजारपेठांमधील मोठे व्यापारी तसेच फुटकळ व्यापारी यांच्या अँटीजन टेस्ट करण्यात  येणार आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर ज्या व्यापाऱ्यांनी ही टेस्ट केलेली असेल त्यांनाच  व्यापार करता येणार आहे. यासंदर्भात सदर व्यापाऱ्यांच्या तपासणीकरिता शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून. तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान नागरिकांना संचारबंदी पूर्वी आवश्यक साहित्य व कामे पूर्ण करणे शक्य व्हावे याकरिता आज संचार बंदीची घोषणा केली असून 6 ऑगस्ट पूर्वी नागरिकांनी आपापली कामे पूर्ण करून घ्यावीत असे आवाहन जिल्हाधिकारी जयवंशी यांनी केले आहे . या पत्रकार परिषदेला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.