हिंगोलीचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी कोरोना पॉझिटीव्ह.

1 min read

हिंगोलीचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी कोरोना पॉझिटीव्ह.

व्हिआयपी उपचार न घेता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोविड वार्डात दाखल, जनतेला काळजी घेण्याचे आवाहन

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली: जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी हे कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान जिल्हाधिकारी जयवंशी यांनी कुठल्याही प्रकारचे व्हिआयपी उपचार न घेता जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या विशेष कोविड वार्डात दाखल होण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील जनतेने काळजी घेऊन नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हाधिकारी जयवंशी यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कोरोना बाधित असल्याचे समोर आले. या बातमीनंतर प्रशासकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली. दरम्यान जिल्हाधिकारी जयवंशी यांनी कुठल्याही प्रकारचे व्हीआयपी उपचार घेण्याचे टाळत स्वतः कोविड वार्डामध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मला प्रत्यक्षात होत असलेले उपचार व त्या ठिकाणांची माहिती घेणे देखील सोपे होईल असे सांगत प्रशासकीय कामकाजावर कुठलाही परिणाम होणार नाही. प्रशासनाचे दैनंदिन कामकाज सुरळितपणे चालू राहील. जनतेने देखील काळजी घेऊन शारीरिक अंतर पाळण्यासह मास्कचा नियमित वापर करावा व वेळोवेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले निर्देश पाळावेत असे आवाहन देखील जयवंशी यांनी केले.