हिंगोली जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांसह एक कर्मचारी कोरोना बाधित

1 min read

हिंगोली जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांसह एक कर्मचारी कोरोना बाधित

जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी राधा बिनोद शर्मा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यापाठोपाठ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी शिवाजी पवार व त्यांच्या विभागातील एका कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज समोर आल्यामुळे जिल्हापरिषद वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.
कोरोना संसर्गाच्या कार्य काळामध्ये ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याबरोबरच विविध उपक्रमांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग नियंत्रण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांनी परिश्रम घेतले आहेत. याच दरम्यान त्यांना संसर्ग झाला. आज गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शिवाजी पवार व आरोग्य विभागातील अन्य एका कर्मचाऱ्यास कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवाजी पवार यांनी जनतेला आवाहन केले असून सर्वांनी नियमांचे पालन करून सामाजिक अंतर राखावा, मास्कचा वापर करावा, तसेच संसर्गाची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या तपासणी केंद्राला भेट देऊन आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान या बातमीमुळे जिल्हापरिषद वर्तुळामध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे.