हिंगोली सामाजिक कार्यकर्ते दिपक अग्रवाल यांचे दुःखद निधन

1 min read

हिंगोली सामाजिक कार्यकर्ते दिपक अग्रवाल यांचे दुःखद निधन

हिंगोली सार्वजनिक गणेश मंडळाचे 20 वर्षापासून सक्रिय पदाधिकारी तसेच राजस्थानी युवक मंडळाचे पदाधिकारी दिपक अग्रवाल हे मनमिळावू स्वभावमुळे परिचित होते.

प्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक अग्रवाल (वय44) यांचे आज गुरुवारी पहाटे नांदेड येथे उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
हिंगोली सार्वजनिक गणेश मंडळाचे 20 वर्षापासून सक्रिय पदाधिकारी तसेच राजस्थानी युवक मंडळाचे पदाधिकारी दिपक अग्रवाल हे मनमिळावू स्वभावमुळे परिचित होते. मागील न.प. निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक देखील लढवली होती. रविवारी त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची आज गुरुवारी पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, 3 भाऊ, बहीण, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.