हिंगोली व्यापा-यांच्या कोरोना टेस्टचे वेळापत्रक जारी.

1 min read

हिंगोली व्यापा-यांच्या कोरोना टेस्टचे वेळापत्रक जारी.

हिंगोली उपविभागीय अधिकाऱ्यांनी जारी केले आदेश

प्रद्युम्न गिरिकर/हिंगोली: कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी हिंगोली शहर व परिसरातील व्यापाऱ्यांच्या अँटीजन टेस्ट संदर्भात वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार संबंधित जे व्यापारी तपासणी करून घेतील त्यांनाच आपली दुकाने उघडण्याचा अधिकार राहील. अशी माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली.
हिंगोली शहर व उपविभागात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने 7 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी बैठक घेतली होती. त्यानुसार हिंगोली शहरातील व परिसरातील व्यापारी व डॉक्टर यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याविषयीचे वेळापत्रक आज उपविभागीय अधिकारी चोरमारे यांनी जाहीर केले.
WhatsApp-Image-2020-08-08-at-4.21.57-PM
त्यानुसार दिनांक 10 ऑगस्ट रोजी हिंगोली शहर व परिसरातील कृषी सेवा केंद्र मालक व सर्व औषध विक्रेते यांची सकाळी नऊ ते दुपारी अडीच पर्यंत सरजुदेवी भिकूलाल भारुका कन्या शाळेमध्ये व माणिक स्मारक विद्यालय मध्ये तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी शहर व परिसरातील सर्व भाजीविक्रेते फळविक्रेते यांची याच ठिकाणी सदर वेळेमध्ये तपासणी करण्यात येईल.
दिनांक 12 ऑगस्ट रोजी शहर व ग्रामीण भागातील सर्व किराणा विक्रेते यांची सदर जागेवर सकाळी नऊ ते अडीच या दरम्यान तपासणी करण्यात येईल .
दि. 13 ऑगस्ट रोजी हिंगोली शहर व नजीकच्या ग्रामीण भागातील सर्व खाजगी वैद्यकीय दवाखाना चालविणाऱ्या डॉक्टरांची तपासणी करण्यात येणार आहे. सदरील व्यवसायाशी निगडित असणाऱ्या व्यक्तीने नेमून दिलेल्या तारीख व वेळेनुसार उपस्थित राहून आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी केले आहे.