हिंगोलीतील वादग्रस्त ग्रामसेवकांची उचलबांगडी.

1 min read

हिंगोलीतील वादग्रस्त ग्रामसेवकांची उचलबांगडी.

जिल्हा परिषद अध्यक्षांनीच केले आरोप.

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली: शहरालगत असणा-या कारवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शिवाजी खरात यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर ग्रामसेवक राजू भगत यांची नियुक्ती केल्याचे आदेश गट विकास अधिकारी मिलिंद पोहरे यांनी काढले आहेत.

वादग्रस्त ग्रामसेवक शिवाजी खरात

हिंगोली शहरालगत असणारी कारवाडी ग्रामपंचायत ही महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत मानल्या जाते. या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शिवाजी खरात यांनी विविध विकास कामांमध्ये अनियमितता व नियमबाह्य विकास कामे केल्याचा आरोप जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांनी केला होता. शिवाय खरात यांची बदली करण्यात यावी व चौकशी करण्यात यावी याबाबतचे पत्र हिंगोली पंचायत समिती गटविकास अधिका-यांना दिले होते. त्याच अनुषंगाने पंचायत समिती गट विकास अधिकारी मिलिंद पोहरे यांनी शिवाजी खरात यांच्या बदलीचे आदेश काढले असून त्यांच्या जागेवर ग्रामसेवक राजू भगत यांची नियुक्ती केली आहे. विशेष बाब म्हणजे खरात हे जवळपास सहा वर्षापासून याच ग्रामपंचायतचे कारभारी होते. पाच वर्षाच्या काळात सदर ग्रामपंचायत अंतर्गत विविध कामे करण्यावरून वाद निर्माण झाले होते. यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर विविध चौकशा सुरू असल्याची चर्चा देखील होत आहे.