हिंगोलीकरांना कोरोनाचे धक्के !

1 min read

हिंगोलीकरांना कोरोनाचे धक्के !

सलग दुस-या दिवशी दोघांचा मृत्यू ,कोरोना बळींची संख्या 5 वर

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली- जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणा-या कोरोनाबाधित दोन रूग्णांचा मंगळवारी पहाटे उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. पाठोपाठ अन्य दोघांची प्रकृती अती गंभीर झाल्याने त्यांना कृत्रिम ऑक्सिजन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला.
हिंगोली शहरातील आझम कॉलनी भागात राहणा-या 35 वर्षीय युवकाला तसेच 55 वर्षीय व्यक्तीला सारी आजाराची लक्षणे आढळून आल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर दोघांचे स्वॅब नमुने घेतले असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले . दरम्यान मंगळवारी दोघांची प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्यांना कृत्रिम श्वास यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी रात्री उशिरा दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. सलग दुस-या दिवशी दोघांचा मृत्यू झाल्यामुळे हिंगोली शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.