हिंगोलीत भटके कुत्रे व डुकरांचा हैदोस, कारण

1 min read

हिंगोलीत भटके कुत्रे व डुकरांचा हैदोस, कारण

नागरिक त्रस्त प्रशासनाला साकडे,इतर शहरातून मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री पकडून आणून सोडली.

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली : शहरामध्ये गेल्या काही महिन्यात भटके कुत्रे व डुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकार्‍यांना निवेदन सादर करीत यासंदर्भात बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
हिंगोली शहरा मध्ये गेल्या काही महिन्यात इतर शहरातून मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री पकडून आणून सोडण्यात आली आहेत. यामुळे शहरातील विविध भागांमध्ये कुत्र्यांची संख्या अचानक वाढली आहे. यामुळे लहान बालकांसह नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे तिरुपती नगर, मस्तानशाहा नगर, मारवाडी गल्ली, कोमटी गल्ली, गाडीपुरा, शिवाजीनगर, पेन्शन पुरा यासह विविध भागांमध्ये मोकाट डुकरांची देखील संख्या वाढली आहे. शहरातील काही डुक्कर पळणाऱ्या व्यक्तींनी डुकरे सोडल्याचा संशय व्यक्त होत आहे. मोकाट डुकरांमुळे ठीक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून यामुळे विविध साथीचे आजार देखील पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. यासंदर्भात नगरपरिषदेने विशेष मोहीम राबवून मोकाट कुत्रे व डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभय कुमार भरतिया यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जावेद राज यांनी नगर परिषद मुख्याधिकारी कुरवाडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.