हिंगोलीतील कोरोनाग्रस्त महिलेचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू

1 min read

हिंगोलीतील कोरोनाग्रस्त महिलेचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू

जिल्ह्यात खळबळ

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली: शहरातील मंगळवारा भागातील 45 वर्ष महिला कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आले होते. महिलेचा महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. सदर महिलेचा सोमवारी रात्री मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना सुरू असल्या तरी नागरिकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे समोर येत आहे. यादरम्यान हिंगोली शहरातील मंगळवारा भागात राहणाऱ्या 45 वर्षीय महिला कोरोना  झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला होता. दरम्यान सदर महिलेची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचाराकरिता नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री सदर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबतची माहिती नांदेड जिल्हा प्रशासनाने जारी केली आहे. सदर माहिती कळताच हिंगोली शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे.