टोकियोत भविना पटेलने रचला इतिहास

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भाविनाने टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक पटकावले

टोकियोत भविना पटेलने रचला इतिहास

टोकियोः भारताच्या भविना पटेलने टोकियोत सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. आपल्या पहिल्याच पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. सुवर्णपदाकाचे स्वप्न अधुरे असले तरी भविनाने रौप्य पदक कमावत इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताचे हे पहिले पदक आहे.

१९ मिनिटे चाललेल्या सामन्यात भविना पटेलने चिनच्या वर्ल्ड नंबर वन यिंगला टक्कर दिली. पण यिंगने सलग सेटमध्ये भविनाचा पराभव केला. यिंगनं पहिल्या सेटपासूनच भविनावर दबाव तयार केला होता. . ७.११, ५-११, ६-११ असा भाविनाचा पराभव झाल्याने तिला रौप्य पदकावर समाधान मानवं लागलं. भाविनाबेनने पहिल्या सेटमध्ये झोउ यींगला चांगली लढत दिली. पण चीनच्या माजी सुवर्णपदक विजेत्याने यींगने भारतीय खेळाडूला नंतर संधी मिळवून दिली नाही. कारण सूर सापडल्यानेमुळे तिने सामन्यात सहज विजय मिळवला.

भाविना ही गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील आहे. तिचे वडील हसमुखभाई पटेल यांचे एक छोटसे दुकान आहे. भाविना पदक जिंकेल, असे कुणाला वाटलेही नव्हते. पण तिने शानदार कामगिरी करत पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे.पॅरालिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.