मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व राज्याचे गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे.या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत, देशमुख यांनी दरमहा १०० कोटींची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबागडी केल्यानंतर सिंग यांनी गृहमंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं. असा खळबळ खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.
जो साधुओं की हत्या और स्त्री का अपमान करे उसका पतन निश्चित है #ParambirSingh #AnilDeshmukh #UddhavThackeray #SanjayRaut pic.twitter.com/lTmZFvEo9F
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 20, 2021
महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने गृहमंत्र्यावर हप्तेखोरीचा आरोप केला आहे. मात्र या आरोपानंतर राज्यसह देशभरात खळबळ उडाली आहे. तसेच समाज माध्यमामातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर अभिनेत्री कंगना राणावत हिने ट्विट करत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
कंगना राणावत हिने आपल्या ट्विट मध्ये,
'जो साधुओं की हत्या और स्त्री का अपमान करे उसका पतन निश्चित है' कंगनाने पालघर साधू हत्या प्रकरणावरून गृहमंत्री देशमुख यांच्यावर टिका केली आहे.