गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही - नवाब मलिक

देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही हा पक्षाचा निर्णय आहे, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही - नवाब मलिक

मुंबईः मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिले आहे. या पत्रावरू गृहमंत्र्यानी राजीनामा द्यावा आसे अनेक नेत्यानी म्हणाले. नवाब मलिक यांनी म्हणटले की देशमुखकांच्या राजीनाम्याची गरज नाही.

विरोधी पक्ष नेत्यानी खोचक टिका देखिल केल्या. काल विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी भाजपने राज्यभर आंदोलन देखिल केले आहे.

परमबीर सिंह दिल्लीत गेले आणि लेटरबॉम्बचे षडयंत्र रचले गेले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. फेब्रुवारी महिन्यात गृहमंत्र्यांना भेटून तक्रार केल्याचा परमबीर सिंह यांचा दावाही मलिक यांनी फेटाळला. देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नाही हा पक्षाचा निर्णय आहे, असेही मलिक यांनी स्पष्ट केले. राज्यातले सरकार अस्थिर करण्याचा कट रचला जातोय असा आरोपही त्यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना केला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.