गृहमंत्र्याचा एनसीबीला इशारा; ड्रग्ज प्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉयची ही चौकशी करा.

1 min read

गृहमंत्र्याचा एनसीबीला इशारा; ड्रग्ज प्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉयची ही चौकशी करा.

विवेक ओबेरॉयची चौकशी करण्यासाठी बंगळुरू पोलीस मुंबईत आले आहेत. मात्र, एनसीबीने अद्यापही या प्रकरणाची चौकशी केलेली नाही. एनसीबीने या प्रकरणाची चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस विवेक ओबेरॉयची चौकशी करेल.

मुंबई: विवेक ओबेरॉय यांच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि इतर काँग्रेस नेत्यांनी केली आहे. विवेक ओबेरॉयची चौकशी करण्यासाठी बंगळुरू पोलीस मुंबईत आले आहेत. मात्र, एनसीबीने अद्यापही या प्रकरणाची चौकशी केलेली नाही. एनसीबीने या प्रकरणाची चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस विवेक ओबेरॉयची चौकशी करेल. असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

विवेक ओबेरॉय हे भाजपचे स्टारप्रचारक आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील 27 भाषेतील बायोपिकमध्ये काम केले आहे. ड्रग्ज प्रकरणात विवेक ओबेरॉय यांचा काय संबंध आहे? याची माहिती बाहेर आलीच पाहिजे, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले.

सचिन सावंत यांनी काल देशमुख यांची भेट घेऊन या संपूर्ण ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.  बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन संदर्भातील सर्व पुरावे हे राज्य सरकारतर्फे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे सोपवले होते. परंतु या माहिती अन्वये एनसीबीने अद्याप चौकशी केलेली नाही. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपीक निर्मात्याचे नाव येत होते. त्या निर्मात्याची चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देखील केली होती. परंतु त्या दिशेने तपासच केला गेला नाही. राज्य सरकारने विनंती करुनही याचा तपास केला गेला नाही.