हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर गेल्यास कायमचाच मुक्काम

1 min read

हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर गेल्यास कायमचाच मुक्काम

उत्तर कोरियामध्ये असे एक हॉटेल आहे जिथे कोणालाही पाचव्या मजल्यावर जाण्याची परवानगी नाही. त्यामागे एक छुपे रहस्य दडलेले आहे.

एकूणच, उत्तर कोरियाला एक गूढ देश म्हणून ओळखले जाते. सहसा कोणत्याही हॉटेलच्या  मजल्याला भेट देण्याची परवानगी नसली तरी उत्तर कोरियामध्ये असे एक हॉटेल आहे जिथे कोणालाही पाचव्या मजल्यावर जाण्याची परवानगी नाही. त्यामागे एक छुपे रहस्य दडलेले आहे.

उत्तर कोरियाच्या या हॉटेलचे नाव यँगकाडो हॉटेल आहे, जे राजधानी प्योंगयांगमध्ये आहे. हे हॉटेल उत्तर कोरियामधील सर्वात मोठे हॉटेल आहे. यासोबतच ही सात, आठ मजल्यांची सर्वात उंच इमारत आहे. हे यांगाक बेटावरील ताएडॅन्ग नदीच्या मध्यभागी वसलेले आहे.

४७ मजली यांगकॅडो हॉटेलमध्ये एकूण १००० खोल्या आहेत. यात चार रेस्टॉरंट्स, एक बाउलिंग एले आणि मसाज पार्लर देखील आहे. उत्तर कोरियामधील हे पहिले लक्झरी हॉटेल आहे, ज्याचे एका खोलीचे भाडे सुमारे २५ हजार रुपये आहे. १९८६ मध्ये या हॉटेलचे काम सुरू करण्यात आले होते. १९९२ मध्ये ते पूर्ण झाले. हे फ्रान्सच्या कॅम्पनॉन बर्नार्ड कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधले होते, जे १९९६ मध्ये लोकांसाठी खुले करण्यात आले होते.

असे म्हणतात की या हॉटेलच्या लिफ्टमध्ये पाचव्या मजल्यावर जाण्यासाठी बटणच नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, लोक उर्वरित कोणत्याही मजल्यावर जाऊ शकतात, परंतु पाचव्या मजल्यावर जाऊ शकत नाहीत. उत्तर कोरियाने याबाबत अत्यंत कडक नियम बनवले आहेत, त्यानुसार जर एखादा परदेशी पाचव्या मजल्यावर गेला तर त्याला इथल्या तुरुंगात कायमचाच मुक्काम ठोकावा लागतो.

२०१६ मध्ये, ऑट्टो वॉर्मबियर नावाचा अमेरिकन विद्यार्थी या हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर गेला, त्यानंतर उत्तर कोरियाच्या पोलिसांनी त्याला हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील पोस्टर काढल्याचा आरोप करून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर, ऑट्टो वॉर्मबियर खटला चालविला गेला आणि त्याला १५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. नंतर त्यांची सुटका झाली असली तरी अमेरिकेत परतल्यानंतर तो कोमामध्ये गेला आणि जून २०१७ मध्ये त्याचा मृत्यू झाला.