सोनू सूदकडे एका दिवसात किती लोक मागतात मदत?

1 min read

सोनू सूदकडे एका दिवसात किती लोक मागतात मदत?

फेसबुक, ट्विटर व मेल वरून लोक मागतात, मदत पहिल्यादांच शेअर केली आकडेवारी.

मनस्विनी साबळे- सोनू सूदने केवळ देशातीलच नाही तर परदेशात अडकलेल्या लोकांनाही मदतीचा हात दिला आहे. इतकंच नाही तर तो बेरोजगारांना रोजगारही देत आहे. शक्य तितक्या लोकांना शक्य ती मदत तो करतो आहे. लॉकडाऊन दरम्यान गरजू लोकांसाठी सुपरहिरो ठरलेला सोनू सूद अजूनही लोकांची भरभरून मदत करत आहे. मजुरांच्या मदतीसाठी सुरु झालेल्या त्याच्या प्रवासाने आता व्यापक रूप घेतलं आहे. सोनूने केवळ देशातीलच नव्हे, तर परदेशातही अडकलेल्या लोकांना मदत केली आहे. इतकेच नव्हे तर, बेरोजगारांना रोजगारही देत आहे.

सोनूला रोज बरेच लोक वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करतात. पण रोज नेमके किती? लोक त्याच्याकडे मदत मागतात याचा खुलासा आतापर्यंत करण्यात आला नव्हता आता, याची नेमकी आकडेवारी सोनूने ट्विटरवर शेअर केली आहे. एका दिवसात मदत मागणाऱ्यांची आकडेवारी पाहून लोक आश्चर्य झाले आहेत. सोनूला ११३७ मेल 19000 फेसबुक आणि 6741 ट्विटर मेसेज. हे आजच्या मदतीचे मेसेज आहेत. सर्वापर्यंत पोहचणं शक्य होत नाही पण तरीही मी माझ्याकडून शक्य ते मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय.