महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा किती मनोरंजन कराल?-राऊत

संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा किती मनोरंजन कराल?-राऊत

मुंबई : शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी भाजप नेत्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आजच्या सामनाच्या रोखठोकमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खा. किरीट सोमय्या यांच्यावर टिका केली आहे. विरोधी पक्षांनी केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच करुन ठेवली असल्याचा खोचक टोला ऱाऊतांनी विरोधांना लगावला आहे. विरोधकांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या विधानांमुळे राज्यात मनोरंजनासाठी सिनेमा नाट्यगृहांची खरंच गरज आहे का? असा सवालही शिवसेना नेते. संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मंत्र्यांवर नवा आरोप करतात आणि त्या मंत्र्यांच्या मतदारसंघात दौरे काढतात. सरकारने त्यांचे दौरे रोखू नयेत असं मला वाटतं,' असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

कोरोनाचा कहर आणि लॉकडाउनचे निर्बंध कायम असले, तरी आपल्या देशातील राजकीय मनोरंजनाचे कार्यक्रम सुरूच आहेत. लोक राजकीय बातम्यांमधून स्वत:चं मनोरंजन करून घेत आहेत. गेल्या काही दिवसांतील आपल्या राजकारण्यांच्या भूमिका, विधाने पाहिली तर महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आता सिनेमा, नाट्यगृहांची खरंच गरज आहे का? असं वाटतं. सर्वत्रच विनोद आणि रहस्यमय असं मनोरंजन सुरू आहे, असंही त्यांनी लेखात म्हटलं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.