'सरकार किती घाबरट आहे', चंद्रकांत पाटील यांची सरकारवर टिका

फुग्याला भोक तुमच्या पडले, आमच्या नाही, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेवर पलटवार

'सरकार किती घाबरट आहे', चंद्रकांत पाटील यांची सरकारवर टिका

पुणेः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फुग्याला भोक तुमच्या पडले आहे, सामनाला किंमत देत नाही. राऊत साहेब तुमच्यावर पण आरोप झालेत, त्यावर पण बघा, असा सवाल पाटील यांनी केला आहे.

नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यां विरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय धुरळा उडाला. नारायण राणे यांच्या समर्थनार्थ भाजप देखील उतरली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वाक्य चुकले नाहीय.थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद आहे. एखादी गोष्ट चुकली तर राणेंना आणि त्यांच्या मुलांना सांगण्यासाठी व्यवस्था आहे, असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चूक झाकण्यासाठी भाजप नेते नारायण राणेंचे वक्तव्य लावून धरण्यात आले. केवढ्याला पडले तुम्हाला? फुग्याला भोक तुमच्या पडले. आमच्या नाही. आम्ही ‘सामना’च्या अग्रलेखाला किंमत देत नाही. राऊतांचे सकाळचे प्रवचन ठरलेले आहे. राऊत तुमच्यावर एका महिलेने आरोप केले, तिला जेलमध्ये जायला भाग पाडले. किती हा सत्तेचा दुरुपयोग, अशी टीकाही पाटील यांनी केली.

सरकार किती घाबरट आहे. काल रात्री 12 वाजल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. अरे वा सिंधुदुर्गातच प्रॉब्लेम आहे का? संपूर्ण महाराष्ट्र पेटला. सगळीकडेच संचारबंदी लावा. संचारबंदी लावल्याने काय होतेय? राणेंच्या यात्रेला मुंबईत प्रचंड प्रतिसाद मिळाला. महापालिका हरली तर काय राहीले? असे वाटल्यानेच त्यांनी हा प्रकार केला. हे उशिरा सूचलेले शहाणपण आहे. शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्याचा हा प्रयत्न आहे. राणे एवढे ठोकतात तुम्ही काहीच बोलत नाहीत. त्यामुळेच हा लटका प्रयत्न झाला. त्यातूनच सिंधुदुर्गात संचारबंदी लावण्यात आली आहे. त्याने आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही.

भाजपा कधीही मनामध्ये राग ठेऊन कोणतेही काम करत नाही. राणे जी यांच्यासोबत जो अमानवीय प्रकार घडला, त्यामुळे त्यांची तब्येतसुद्धा बिघडली. त्यांना अटक केल्यानंतर कोणतेही वैद्यकीय उपचार वेळेवर दिले गेले नाहीत. त्यांची तब्येत ठीक झाल्यानंतर जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरू होईल. असे ट्टिव करत पाटील यांनी सांगितले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.