माजी आमदार आणि नव्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष झालेले हर्षवर्धन जाधव यांच्यावर रात्री क्रांती चौक पोलीस ठाण्यात जातीवााचक शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द सुरू होण्याआधीच चर्चेत आली आहे.
हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या पक्षाची सुरूवात करताना स्वतःच्या अदालत रोडवरील इमारतीत कार्यालय सुरू केले होते. तेथील एका टपरीवरून वाद झाल्याचे आणि जातीवाचक शिवीगाळ झाल्याचे हे प्रकरण आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या परीवाराच्या मालकीची इमारत अदालत रोडवर आहे. याच इमारतीत त्यांनी आपल्या पक्षाचे कार्यालय देखील सुरू केले होते. मात्र नव्याने बांधकाम करण्यासाठी जाधव यांनी ही इमारत पाडली आहे. याच रिकाम्या जागेसमोर एका अनुसुचित जातीच्या व्यक्तीने टपरी टाकून व्यवसाय सुरू केला होता. हर्षवर्धन जाधव हे अतिक्रमण हटविण्यासाठी दबाव टाकत होते. यावरूनच दोघांच्या मध्ये वाद होते. काल रात्री हर्षवर्धन जाधव यांनी टपरी हटविण्यासाठी वाद घातला आणि जातीवाचक शिविगाळ केल्याची फिर्याद तक्रारदार व्यक्तीने दिली आणि क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यात अद्याप कोणाला अटक झाली नसून आता हर्षवर्धन जाधव यांना अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.
हर्षवर्धन जाधव पूर्वी मनसेत असाताना पोलीस अधिका-यांना मारहाण केली म्हणून अटक व त्यांना मारहाण देखील झाली होती. त्यानंतर ते सेनेत असताना पोलीसांच्या कानशिलात मारत शिविगाळ केल्याचा गुन्हा नागपूर मध्ये दाखल झाला होता.
आता परत हा गुन्हा दाखल झाल्याने ते चर्चेत आले आहेत.
हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा
मनसेचे नवीन जिल्हाध्यक्ष आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव परत एकदा नवीन वादात सापडले आहेत. त्यांच्यावर जातीवाचक शिविगाळ केल्याचा गुन्हा औरंगाबाद मधील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

Loading...