वन विभागाने रोपवाटीका बंद केल्याने शेकडो मजूरांची उपासमार

तालूक्यातील पंचेविस पेक्षा जास्त रोपवाटीका बंद

वन विभागाने रोपवाटीका बंद केल्याने शेकडो  मजूरांची उपासमार

निटूर / विजय देशमुख : वन विभागा मार्फत चालविल्या जाणाऱ्या निलंगा तालूक्यातील पंचेविस पेक्षा जास्त रोपवाटीका वनविभागाने बंद केल्याने यामध्ये काम करणाऱ्या शेकडो मजूरांची उपासमार होत असून बंद असलेल्या तालूक्यातील सर्वच रोपवाटीका सुरू कराव्यात अशी मागणी काम करणारे मजूर करत आहेत.

वन विभागा मार्फत तालूक्यात पंचेविस पेक्षा जास्त रोपवाटीका निलंगा तालूक्यातील विविध गावामध्ये चालवल्या जातात यामध्ये एका रोपवाटीकामध्ये साधारणपणे पुरूष , स्ञीया मिळून पंचेविस मजूर महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत काम करत होते त्यामध्ये रोजचे दोनशे अडोतीस रूपये प्रमाणे मजूरांना मजूरी मिळायची त्यामुळे अनेक कुटूंबाची गुजरान या रोपवाटीकेच्या कामामधून होत होती माञ शासनाकडे पैसा नाही व सर्व निधी कोरोना संसर्ग निवारणासाठी वळवण्यात आल्याने सध्या रोपवाटीकेला मंजूरी मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे तालूक्यातील पंचेविस पेक्षा जास्त रोपवाटीका बंद असल्यामुळे शेकडो मजूरांची उपासमार होत आहे .रोपवाटीका सुरू करण्यासाठी साधारणपणे मार्च महीन्यामध्ये शासन मंजूरी देत असते माञ यावर्षी मंजूरीच मिळाली नसल्याची माहीती आहे कोरोना संसर्गासाठी सर्व निधी शासनाने वळविला असल्याचे सांगून जिल्हाभरातील सर्वच रोपवाटीका बंद असल्याचे सांगण्यात आले .

दरम्यान निलंग्याच्या वनविभागा मार्फत चालवल्या जाणाऱ्या रोपवाटीका पाऊस सुरू झाल्यावर सुरू होतील असे सांगण्यात येत होते सध्या पावसाला सुरूवात झाली आहे त्यामुळे रोपवाटीका सुरू होणे गरजेचे असताना वन विभाग ही त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते आहे .तालूक्यात अनेक ठिकाणी रोपवाटीका बंद आहेत माञ त्या ठिकाणी एक दोन मजूर कामावर आहेत त्यासाठी निधी कुठून येतो असा प्रश्न कामगार उपस्थित करत आहेत.एकूणच तालूक्यातील रोपवाटीका बंद होण्याने अनेक मजूराची उपासमार होत असून त्या तात्काळ सुरू कराव्यात अशी मागणी होत आहे .


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.