हुंड्यासाठी पतीचा तगादा, पत्नीची आत्महत्या

ठाणे जिल्ह्यातील कापूरबावाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हुंड्यासाठी पतीचा तगादा, पत्नीची  आत्महत्या

निलंगाः माहेरहून कार घेण्यासाठी पैसे घेऊन ये म्हणून दारूच्या नशेत मानसिक व शारीरिक त्रास दिल्यामुळे एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, निलंगा शहरातील मुळ रहिवासी असलेले डावळे कुटुंब व उस्मानाबाद जिल्ह्यातील घोगरे यांच्यात २०१७ साली रीतीरिवाजाप्रमाणे विवाह संपन्न झाला होता. निलंगा येथील इंद्रजीत जयराम डावळे व मेघा यांचे चार वर्षापूर्वी लग्न झाले असून ते ठाणे जिल्ह्यातील कोलशेत रोड येथे बँक कडून कर्ज काढून घेतलेल्या फ्लॅटमध्ये रहात होते. इंद्जित सतत नशा करत होता. नशेमध्ये मारहाण करणे मानसिक व शारीरिक त्रास देत असे व तुझ्या आई वडीलाकडून फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी व नवीन चारचाकी गाडी घेण्यासाठी तगादा लावायचा व मारायचा असा अरोप करत मयत मेघाच्या भावाने तक्रार दिली आहे.

तसेच पतीच्या सततच्या छळाला कंटाळून मेघाने रहात्या घरी बेडरूममध्ये गळफास घेतला, असता तीचा फास काढून तीला पतीने हायलँड या हास्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.माझ्या आई वडीलांना फोन करून बोलावून घेऊन हास्पीटल मध्ये जाऊ दिले नाही व तुमच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. म्हणून उपचार चालू असल्याची खोटे माहिती दिली.पतीच्या सततच्या त्रासाला व मारहाणीला कंटाळून माझ्या बहिणीने आत्महत्या केली आहे. अशी तक्रार कापूरबावाडी पोलिस ठाणे जिल्हा ठाणे येथे दिली असून संबंधित पतीवर योग्य ती कारवाई करावी अशी तक्रार मयत मेघाचा भाऊ विशाल हरीदास घोगरे रा.उस्मानाबाद यानी दिली आहे.या तक्रारीवरून संबंधित मेघाचा पती इंद्रजित जयराम डावळे यांच्यावर कापूरबावाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.