पत्नीची निर्घृण हत्या करून पतीची आत्महत्या

औरंगाबादमधील टाकळीवाडी, गंगापुर येथील धक्कादायक प्रकार

पत्नीची निर्घृण हत्या करून पतीची आत्महत्या

औरंगाबाद : आपसातील वाद विकोपाला गेल्याने पतीने, पत्नीचा कुऱ्हाडीने खून करून स्वतः सुद्धा विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना टाकळीवाडी (ता.गंगापूर) येथे शनिवारी घडली. हा प्रकार रविवारी (दि.१७) रोजी सकाळी उघडकीस आला. चंपालाल तानासिंग बिघोत (वय.५५), गंगाबाई चंपालाल बिघोत (वय.४८ रा.टाकळीवाडी ता.गंगापूर) असे या घटनेतील मृत पती, पत्नीचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळीवाडी येथील बिघोत दांपत्य शनिवारी रात्री कामे आटोपून शेतात असलेल्या घराच्या ओट्यावर झोपले होते. त्यांचा एक मुलगा मुंबईत पोलीस दलात कार्यरत आहे. तर दुसरा मुलगा घरात झोपला होता. मात्र, मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास या पती, पत्नीमध्ये भांडण जुंपले. यानंतर हा वाद विकोपाला गेल्याने पती चंपालाल याने पत्नी गंगाबाईच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून घरात झोपलेल्या मुलाला जाग आली. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु बाहेरून कड़ी लावलेली असल्यामुळे त्याने आरडाओरड केली. तेव्हा शेजारी राहत असलेल्या नातेवाईकांनी येऊन त्याला बाहेर काढले आणि गंभीर जखमी गंगाबाई यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात हलविले. याचदरम्यान चंपालाल बिघोत याने पत्नी ठार झाल्याने जवळच असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दुसरीकडे रुग्णालयात नेल्यावर उपचार सुरु असताना गंगाबाई यांचीही प्राणज्योत मालवली.

याबाबत रविवारी सकाळी पोलिसांना कळविले असता दौलताबाद पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह वर काढून शवविच्छेदनासाठी पाठविला. यानंतर घटनास्थळी पोलिसांसह फाँरेन्सिकचे अधिकारी तसेच ठसे तज्ञांची घटनास्थळाहून गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड व रक्ताने माखलेले कपडे आदी साहित्य जप्त केले. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.