मी पुन्हा येईन...

करुणा शर्मांनी आपल्या व्हिडीओतुन काही गंभीर विषय समोर आणले आहेत. मी पुन्हा येईन असं त्या वारंवार म्हणत आहेत.

मी पुन्हा येईन...

महाराष्ट्रः हे शीर्षक पाहिल्यावर देवेंद्र फडणवीसांची काही नवी चर्चा आहे का? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. पण करुणा शर्मा हा विषय सध्या सातत्याने चर्चेत आहे आणि त्याबाबतच आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. "मी पुन्हा येईन" असं त्या वारंवार म्हणत आहेत. न्यायालयीन प्रक्रीया चालू असातना अचानक त्या तोफगोळा का टाकत आहेत? करुणा शर्मा काही गोष्टी उघड करणार आहेत का? त्यात काही राजकारण्यांच्या मुद्यांवरही त्या बोलल्या आहेत, एकुणच हे प्रकरणच विक्षिप्त आहे.

करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे या दोघांच्या वैक्तिगत संबंधांबाबत आम्हाला कोणतंही भाष्य करायचं नाही. या दोघांच्या संबंधाविषयी चकार शब्दही काढायचा नाही पण तरीही हा मुद्दा आम्हाला मांडायचा आहे कारण त्या भाषणातील काही मुद्दे अगदी महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे अजित पवार, दुसरा म्हणजे पंकजा मुंडे आणि तिसरा मुद्दा म्हणजे एका लहान मुलीचा उल्लेख त्यांच्या भाषणत होता. सार्वजनिक जिवनात वावरणा-या दोन अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिंचा समावेश त्या व्हिडीओमध्ये होता. "अजित पवारांबाबत धनंजय मुंडे माझ्याजवळ काय काय बोलत होते, हे मी सांगु शकते पण सांगणार नाही" असा दावा करुणा मुंडेंनी केला आहे. अजित पवारांविषयीची अशी कोणती गोष्ट धनंजय मुंडेंनी त्यांच्याकडे व्यक्त केली आहे? मधल्या काळात अजित पवार जेव्हा राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन फडणवीसांकडे गेले होते आणि त्यांनी सत्तांतर घडवुन आणलं होतं, तेव्हापासुन धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच जमत नसल्याची चर्चा आहे. म्हणजेच त्यासंबंधी काही मुंडेंनी करुणा शर्मांना सांगितलं असेल का? राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख या महिला का करत आहेत? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे पंकजा मुंडे यांनी कधीही या विषयावर सार्वजनिक किंवा खासगी भाष्य केलं नाही. अगदी रेणु यांनी आरोप केल्यावरही त्या काही बोलल्या नव्हत्या. अशी स्थिती असताना आता अचानक पंकजा मुंडे यांच नाव घेऊन त्यांच्याशी कसं वागलेत हे सांगण्यामागचा हेतु त्यांच्या समर्थकांचा पाठिंबा घेणे हा आहे, की खरंच काही सांगायचं आहे? कारण त्या वारंवार आपल्याच पतीचा उल्लेख शडयंत्रकारी असा करतात. त्यामुळे धनंजय मुंडेंनी काही वेगळं शडयंत्र केलं आहे का? कारण त्या आपल्या बोलण्यात गोपीनाथ मुंडेंच्या पैशावर मोठे झालेले लोक, त्यांनी कसा दगा दिला असा उल्लेख केला आहे. पंकजा मुंडे यातुन पु्र्णपणे बाजुला झाल्या आहेत आणि या विषयावर न बोलण्याची त्यांनी भुमिका घेतली आहे. मग त्यांच नाव या प्रकरणात का आलं?

त्यापेक्षाही गंभीर गोष्ट म्हणजे करुणा शर्मांनी वारंवार एक उल्लेख केला आहे. "मी आपल्या वडीलांच्या वयाच्या असणा-या माणसासोबत संबंध ठेवणा-या स्त्रीला उघड करणार आहे" असं त्या म्हणाल्या. हे केवळ आताच नाही तर यापुर्वीही त्यांनी या आशयाची फेसबुक पोस्टही केली होती. 'एक मुलगी मला फोन करुन धमकी देते पण मी अशा धमक्यांना घाबरत नाही' असंही त्या म्हणाल्या. हे काय प्रकरण आहे? हे सगळं खरंच घडतंय की केवळ चर्चेत येण्यासाठी केलेली कृती आहे? हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. म्हणूनच या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. होणारे आरोप गंभीर आहेत, फौजदारी आहेत, चर्चा व्हावी असे आहेत. धनंजय मुंडेंनी आपले आरोप जाहीर केले आहेत असं असतानाही त्या वारंवार पुन्हा येणाची भाषा का करत आहेत? आता पुढे काय होईल ते कोणालाही माहिती नाही पण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी चिंताजनक आहेत.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.