असे ओळखा भेसळयुक्त पनीर

सध्या बाजारात अनेक जण भेसळयुक्त पनीरची विक्री करत आहेत. म्हणूनच, भेसळयुक्त पनीर कसं ओळखावं हे आपण बघू.

असे ओळखा भेसळयुक्त पनीर

अनेक जणांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ अजिबात आवडत नाहीत. मात्र, पनीर हा असा एक पदार्थ आहे जो सगळे जण आवडीने खातात. पनीरपासून अनेक विविध पदार्थ तयार केले जातात. यात पनीरची भाजी, पनीर रोल्स, पनीर मोमोज हे पदार्थ अनेकांना आवडतात. कोणत्याही पदार्थामध्ये पनीर मिक्स केलं की त्या पदार्थाची चव दुप्पट होते. त्यामुळे पनीरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र ही वाढती मागणी पाहता. सध्या बाजारात अनेक जण भेसळयुक्त पनीरची विक्री करत आहेत. म्हणूनच, भेसळयुक्त पनीर कसं ओळखावं हे आपण बघू.

१. जर पनीरमध्ये भेसळ असेल तर ते रबरासारखं लागतं.

२. पनीर ताजं आणि शुद्ध असेल तर त्यात थोडा चिकटपणा असतो. मात्र, तेच भेसळयुक्त असेल तर त्यात चिकटपणा नसतो.

३. भेसळयुक्त पनीर पटकन शिजून मऊ होत नाही.

४. पनीरमध्ये कोरडेपणा असतो.

५. भेसळयुक्त पनीरमध्ये दुधाचा येणारा विशिष्ट वास नसतो.

असे करुन ओळखा पनीरमध्ये भेसळ आहे की नाही
प्रथम पनीर पाण्यात टाका आणि ते पाणी उकळून थंड करा. पाणी गार झाल्यावर त्यात आयोडीन टिंचरचे काही थेंब टाका. जर आयोडीन टिंचर टाकल्यावर पनीरचा रंग बदलला आणि निळा झाला तर समजा या पनीरमध्ये भेसळ आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.