मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला तर अभिमान आहे- प्रवीण दरेकर

तर सोनिया गांधी आणि शरद पवार हे उपपंतप्रधान होऊन हाताखाली काम करतील

मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला तर अभिमान आहे- प्रवीण दरेकर

बुलडाणा, २९ मे: शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी लिहिलेल्या एका लेखात उद्धव ठाकरे हे देशाचे पंतप्रधान व्हावेत ही जनतेची इच्छा आहे, असं म्हटलं होतं यावर उद्धव ठाकरे हे पंतप्रधान झाल्यास मराठी माणूस म्हणून मला अभिमान असेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे आमदार श्वेता महाले यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी ते आले होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मराठी माणूस पंतप्रधान झाला तर अभिमान आहे, मात्र त्यासाठी संख्याबळ असावे लागते. तर सोनिया गांधी आणि शरद पवार हे उपपंतप्रधान होऊन हाताखाली काम करतील असा टोलाही दरेकरांनी हर्षल प्रधान यांनी लिहिलेल्या लेखावर भाष्य करताना लगावला आहे. संजय राऊत हे उठले की केंद्राच्या नावाने शिमगा करतात. त्यांना दुसरे कामच नाहीये. आपलं अपयश झाकण्यासाठी संजय राऊत हे सातत्याने केंद्रावर टीका करतात. तसेच भाजप, माझ्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करतात असं वक्तव्य करत त्यांनी संजय राऊतांवर देखील टीका केली आहे.

हर्षल प्रधान यांनी लेखात काय म्हटलं होतं?
हर्षल प्रधान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्याचं कौतुक करत म्हटलं होतं की,कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंनी आपली प्रतिमा केवळ जनतेच्या मनात नाही तर सर्वांच्याच मनात निर्माण केली आहे. मुख्यमंत्री संवेदनशील आणि विनम्र नेत्यांपैकी एक नेते आहेत. ते असे एकमेव मुख्यमंत्री आहेत जे सातत्याने जनतेसोबत संवाद साधतात, त्यामुळे उद्धव ठाकरे हे पंतप्रधान व्हावेत ही जनतेची इच्छा आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.