कॉग्रेस सत्तेत आल्यास 10 किलो तांदूळ गोरगरिबांना देऊ,तर येडियुरप्पा हे लबाड मुख्यमंत्री

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर जोरदार टिका, काँग्रेस पक्षाची हुलसूर येथे भव्य सभा

कॉग्रेस सत्तेत आल्यास 10 किलो तांदूळ गोरगरिबांना देऊ,तर येडियुरप्पा हे लबाड मुख्यमंत्री

एम.एस.हुलसूरकर/हुलसूर: कर्नाटकातील बसवकल्याणची विधानसभा पोटनिवडणुक पार पडत आहे. बसवकल्याण कॉग्रेसचे आमदार बी. नारायण राव यांचे काही महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाले होते.त्यांच्या पाश्चात ही पोटनिवडणूक होत आहे. कॉग्रेसकडून त्यांच्या पत्नी माला (मल्लम्मा) बी. नारायण राव या निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याच प्रचारार्थ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी हुलसूर येथे जाहीर सभा घेतली. आमचे सरकार सत्तेत आल्यास 10 किलो तांदूळ गोरगरिबांना देऊ असे आश्वासन सिद्दारामया यांनी दिले. कॉंग्रेसच्या उमेदवार माला (मल्लम्मा) बी. नारायण राव यांच्या प्रचारात, त्यांनी बी नारायण राव यांच्या वतीने जाहीर सभेला संबोधित केले.

आमच्या काळात हुलसूर तालुक्याला मान्यता दिली. यासाठी आणखी गावे जोडण्याची गरज असताना सरकार कोणताही विचार-विमर्श करीत नाही. आम्ही सरकारवर दबाव आणूण आणखी गावे जोडण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन ही सिद्धरामय्या यांनी परिसरातील लोकांनी दिले.

मी मुख्यमंत्री असताना नारायण राव यांनी बसवकल्याणच्या विकासासाठी बरेच अनुदान दिले होते. आमदार म्हणून निवडून आल्यापासून मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले परंतु कोरोनाने आपला पराभव केला. पण कॉंग्रेसने माला बी.नारायण राव यांना उमेदवारी देऊन नारायण राव यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरूण काढू असही ते म्हणाले. हे एक महान लबाड मुख्यमंत्री आहेत. तुम्ही त्यांच्यावर बोलण्यावर विश्वास ठेवू नका अशी टिका करत सिध्दारामय्या यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.