औरंगाबाद : राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्रिक्रीला बंदी आहे. मात्र तरीही बेकायदेशीर पद्धतीने गुटख्याची विक्री केली जात आहे. मात्र आता या गुटखा विक्री करणाऱ्यांना आळा बसणार आहे. गुटखा विक्री करणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा आणि त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे.
आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ सोबतच कलम ३२८ लावता येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
२०१२ पासून गुटखाजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. मात्र राज्यात सर्रास विक्री सुरु आहे. याबाबत एका एका आरोपीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र राज्यातील मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी तसेच नगर व धुळे जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी विरोध करत उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठात रिटा याचिका दाखल केली. यावर सर्वोच्च न्यायालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीविरोधात कलम १८८ व ३२८ लावणे आवश्यक असल्याचं सांगून उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय रद्द केला.
गुटखा विक्री करणाऱ्यास होणार इतक्या वर्षांची शिक्षा
आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ सोबतच कलम ३२८ लावता येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

Loading...