'मुख्यमंत्री लायक असते तर दिल्लीत येण्याची वेळ आली नसती'-खा. नवनीत राणा

मुख्यमंत्री लायक असते तर त्यांना दिल्लीत येण्याची वेळ आली नसती. आई-वडील कधीही मुलांसाठी रडत नाहीत, अशा शब्दांत खा. नवनीत राणांची मुख्यमंत्र्यांवर टीका

'मुख्यमंत्री लायक असते तर दिल्लीत येण्याची वेळ आली नसती'-खा. नवनीत राणा

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. मुख्यमंत्री लायक असते तर त्यांना दिल्लीत येण्याची वेळ आली नसती. आई-वडील कधीही मुलांसाठी रडत नाहीत अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांना अनेक विषयांवर मोदींना भेटायचं होतं म्हणुन त्यांनी ही संधी साधली, असंही त्या यावेळी म्हणाल्या. मंगळवारी दिल्लीत आयोजीत एका पत्रकार परिषदेत त्या बोतल होत्या. यावेळी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यावरुनही त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

मुंबई उच्च न्यायालयानकडून नवनीत राणा यांच जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं, तसेच त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. न्यायालयाच्या या निर्णयावरुन राणा यांची खासदारकीही धोक्यात येवु शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र यावर पत्रकार परिषद घेत, त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

" उच्च न्यायालयाने दिलेला आदेश मी अद्याप वाचलेला नाही. पण यात नक्कीच पॉलिटिकल खिचडी आहे असं धक्कादायक विधान त्यांनी केलं आहे. कारण अचानक न्यायालयाचा असा आदेश येणं यात कुठेतरी पॉलीटीकल खिचडी शिजली हे नक्की, गेली नऊ वर्षे मी हा लढा लढती आहे. यामध्ये कोणी राजकारण केलं हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र माझा आणि शिवसेनेचा हा वाद सगळ्यांनाच माहिती असल्याचं राणा यांनी म्हंटलं आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर मी सर्वोच्च न्यायालयात जाईन, मला न्यायावर विश्वास आहे, असंही त्या म्हणाल्या."


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.