मतदार याद्या दुरुस्त केल्यास नगरपंचायतीत राष्ट्रवादीचीच सत्ता-मंत्री मलिक

६५ गाव योजनेत दोन लाख लिटर पाण्याची टाकी उभारण्यात येणार..

मतदार याद्या दुरुस्त केल्यास नगरपंचायतीत राष्ट्रवादीचीच सत्ता-मंत्री  मलिक

परभणी : आगामी काळात होणार्या पालम नगरपंचायतीच्या निवडणुकीतील मतदारयाद्यांत घोळ केल्याची तक्रार माझ्यापर्यंत आली आहे. तरीही पक्षाने या मतदारयाद्यांवर आक्षेप घेवून याद्या दुरूस्त करून घ्याव्यात. नगरपालिकेच्या अधिका-यांना या याद्यांच्या चुका समजून सांगाव्यात. या याद्या दुरूस्त झाल्यानंतर पालम नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता येण्यापासुन कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास पालकमंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

पालम तहसील कार्यालयासमोर आज पालम तालुका ६५ गाव योजना पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे भूमिपूजन पाकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी, मा. खा. सुरेश जाधव, जि. प. सदस्य भरत घनदाट, तालुकाध्यक्ष वसंत सिरस्कर, विजयकुमार शिंदे, कृष्णा दळणर, कादर गुळखंडकर, मारोती आवरंगड व्यासपीठावर उपस्थित होते. पालकमंत्री मलिक बोलताना पुढे म्हणाले की, ६५ गाव पाणीपुरवठा योजना ही १७ कोटी २८ लाखांची आहे. ती दीड वर्षात पुर्ण करण्याच्या अटीवरच कंत्राटदारांना दिली आहे. म्हणून ती मुदतीत पुर्ण व्हावी, ही जबाबदारी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व कंत्राटदाराची आहे. शिवाय, नुसती योजना पुर्ण करून पाणी देणे, हाही उद्धेश नाही. तर जनतेला शुद्ध पाणी द्यावे लागणार आहे, असे पालकमंत्री मलिक म्हणाले.

पालम नगरपंचायतीला भाजपच्या काळात एवढा निधी येवून काय कामे केली, असा सवाल आमदार दुर्राणी यांनी उपस्थित केला. मुळात एवढ्या पैशांत गंगाखेड ते पालमपर्यंत उड्डाणपुल झाला असता. निव्वळ रस्त्यासाठी ४० कोटी रूपये आले. त्यात काय कामे केली, त्यातून किती रस्ते बांधले, असा प्रश्नही त्यांनी केला. हा प्रश्न विधीमंडळात विचारला आहे. परंतु दुर्देवाने महाराष्ट्रात कोरोनामुळे विधानसभेचे कामकाज होवू शकले नाही. मात्र प्रश्न विचारणे थांबले, असे नाही. आगामी काळात पुन्हा याच प्रश्नावर आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचा इशाराही दिला. मुळात ६५ गाव योजनेत दोन लाख लिटर पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. वास्तविक वाढत्या लोकसंख्येप्रमाणे नियोजन झाले नाही. तसेच नगरपंचायतीमध्ये भाजपचा पंचवार्षिक कार्यकाळ संपला आहे. पंचायतीवर प्रशासक असून तुम्हाला कुठलाही अधिकार नसताना भाजपने जलकुंभ भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकला. तुमची सत्ता असेल तर ते करताही आले असते. परंतु तुमच्या हातात नसतानाही जुलकुंभ भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला, याबद्दल दुर्राणी यांनी आक्षेप घेतला. अजय हनवते यांनी सूत्रसंचालन केले. गंगाधर सिरस्कर यांनी आभार मानले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.