सत्तेत नसता तर १ गल्ली सुद्धा बंद करण्याची धमक तुमच्यात नाही- राणेंची ठाकरे सरकारवर टिका

सत्तेत नसता तर १ गल्ली सुद्धा बंद करण्याची धमक तुमच्यात नाही- राणेंची ठाकरे सरकारवर टिका

मुंबई : उत्तरप्रदेशमधील लखीपूरमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले. या घटनेचा निषेध म्हणुन काल महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती. त्यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी ट्विटरवरुन महाविकास आघाडीचा समाचार घेतला आहे.

३ पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि जेमतेम २५% काही ठिकाणी बंद दिसला, महाविकास आघाडीसाठी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे कारण सत्तेत असून जर १०० टक्के बंद होत नसेल म्हणजे तुमची काय लायकी आहे यावरून लक्षात येते. सत्तेत नसता तर १ गल्ली सुद्धा बंद करण्याची धमक तुमच्यात नाही. असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये ही शिवाजी महाराजांची आज्ञा होती पण आजच्या बंद दिवशी मालवणात शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी एका शेतकऱ्याची सफरचंद चोरून खालली. काहीतरी लाज राखा वाझेच्या औलादीनो, शिवाजी महाराज असते तर पाठीवर चाबकाचे कोरडे ओढले असते. अशा शब्दात राणे यांनी शिवसेनेवर टिका केली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.