'ही' लक्षणं दिसत असतील तर लगेच डोळे तपासा

सतत कम्प्युटर स्क्रीनवर काम करणं, मोबाइलचा सतत उपयोग करणं, टीव्ही पाहणं किंवा वाचणं यांमुळे डोळ्याच्या समस्या जाणवतात...

'ही' लक्षणं दिसत असतील तर लगेच डोळे तपासा

डोळे म्हणजे महत्त्वाच्या ज्ञानेंद्रियांपैकी एक. डोळ्यांमुळेच आपण सभोवतालचं जग पाहू शकतो. पण अनेकदा डोळ्यांच्या आरोग्याकडे आपण दुर्लक्षं करतो. अनेकदा डोळ्यांना जाणवणाऱ्या छोट्या-छोट्या समस्या आपण सामान्य समजतो. पण या छोट्या समस्या पुढे जाऊन गंभीर ठरू शकतात. तसेच दैनंदिन जीवनात सतत कम्प्युटर स्क्रीनवर काम करणं, मोबाइलचा सतत उपयोग करणं, टीव्ही पाहणं किंवा वाचणं यांमुळे डोळे थकतात. आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्याकडे दुर्लक्षं करणं महागात पडू शकतं. तसेच ही लक्षणं दिसून आली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.

डोकेदुखीचा त्रास होणं
अनेकदा डोकेदुखीचा त्रास सतावतो. अशातच त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी काही औषधं घेतली जातात. पण औषधांचाही काहीच उपयोग होत नाही आणि डोकेदुखीचा त्रास पुन्हा सतावू लागतो. पण अशातच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. अनेकदा डोकं दुखण्याचं कारण डोळेही असू शकतात. डोळ्यांच्या समस्या कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाइल किंवा टिव्ही स्क्रिन समोर सतत बसल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो.

धुरकट दिसणं
वाढत्या वयानुसार डोळ्यांच्या समस्या उद्भवतात. परंतु, अनेकदा कमी वयातच डोळ्यांना सूज येणं, धुरकट दिसणं यांसारख्या समस्या जाणवू लागतात. अनेकदा या समस्येकडे अशक्तपणाचं लक्षण समजून दुर्लक्ष केलं जातं. परंतु, या समस्येकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. धुरकट दिसणं एखाद्या आजाराचं लक्षणं असू शकतं. हे डोळ्यांच्या रेटिन्यालाही नुकसान पोहचवू शकतं. अशा परिस्थितीत लगेच डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे.

डोळ्यांना थकवा जाणवणं
तुमच्या डोळ्यांना सतत थकवा जाणवत असेल तर तज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. अनेकदा डोळ्यांशी निगडीत आजारांचं लक्षण असण्याचीही शक्यता असते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.