रस्त्यावर पार्किंग करताय तर वेळीच व्हा सावधान,नाहीतर भरावा लागेल दंड.

1 min read

रस्त्यावर पार्किंग करताय तर वेळीच व्हा सावधान,नाहीतर भरावा लागेल दंड.

रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांसाठी मनपा आकारणार पार्किंग शुल्क

सुमित दंडुके/औरंगाबाद,दि.३० : महापालिकेने शहरातील रस्त्यांची वर्गवारी ठरवली आहे. या वर्गवारीनुसार आता पार्किंग शुल्क वसूल केले जाणार आहे. कोणत्या रस्त्यावर किती पार्किंग शुल्क असावे याची आखणी करण्यात आली आहे. महापालिकेने जून महिन्यात पार्किंग शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेताना शहरातील खाजगी वाहनांची संख्या किती आहे याचा अभ्यास केला आहे. शहरात चारचाकी वाहनांसाठी पार्किंगचे पालिका क्षेत्रात नियोजन नाही, त्यामुळे रस्त्याशेजारी वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी व पार्किंगची सोय लावण्यासाठी महापालिकेने रस्त्यांची वर्गवारी केली आहे.
रस्त्यांच्या वापरानुसार तीन गटात रस्त्यांची वर्गवारी करण्यात आली आहे. रस्त्याच्या रुंदी नुसार अ , ब , क वर्ग तयार केला आहे. या रस्त्यावर वाहनांच्या प्रकारानुसार त्यांचे शुल्क निश्चित केले जाणार आहे. शुल्क निश्चित करताना खाजगी दुचाकी, चारचाकी वाहने, व्यवसायिक जड वाहने असे वर्गीकरण केले आहे. रस्त्यांचा वर्ग, वाहनांचा प्रकार यानुसार त्याची रचना करण्यात आली आहे.