अवैध स्वस्त धान्य घेऊन जाणारा ट्रक ताब्यात

१२ लाख रूपये किमंतीचा ५६ टन तांदुळ पकडण्यात आला आहे..

अवैध स्वस्त धान्य घेऊन जाणारा ट्रक ताब्यात

लातूर : उमरग्याहून जात असलेल्या दोन ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ असल्याच्या संशयावरूनलातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतले. यात १२ लाख रूपये किमंतीचा ५६ टन तांदुळ पकडण्यात आला असून पुढील चौकशी करून कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

लातूर-नांदेड महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरु असताना रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
यातील दोन ट्रकमध्ये स्वस्त धान्य दुकानातील तांदुळ अवैद्य मार्गाने विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. यावरून चाकूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हणमंत आरदवाड, ईश्वर स्वामी, हणमंत मस्के व इतर पोलीसांनी या दोन ट्रकची तपासणी केली. त्यावेळी त्यामध्ये तांदुळ आढळून आला. याबाबत चालकास याबाबत विचारणा केली असता हा कर्नाटक राज्यातून तांदुळ गोंदीया येथे घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. परंतू ट्रकचे वजन उमरगा चौरस्ता येथे करण्यात आल्याचे दिसून आले. चालक देत असलेली माहिती व कागदपत्र यात तफावत असून तांदुळ स्वस्त धान्य दुकानाला पुरवठा केला जाणार असल्याचा संशय आल्यामुळे पोलीसांनी दोन्ही ट्रक ठाण्यात आणले. ट्रकचे चालक बीरागोंडा ईश्वर हुगुंडा (वय ३०) व अहमद अमिर पटेल (वय २५) रा. दोघें वडनखेरा ता. हुमनाबाद) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

यांच्यावर कार्यवाही करण्यासाठीचे पत्र पोलीसांनी तहसीलदारांना दिल्यावरून पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार बालाजी चितळे यांनी ट्रक मधील तांदळाची पाहणी केली व याचे नमुने घेतले आहेत. सदरील तांदळाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार असून त्यांच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.