अवैद्य वाळू तस्करी करणारा ट्रॅक्टर वडोद बाजार पोलिसांकडून जप्त

रात्रगस्ती दरम्यान पोलिसांची कारवाई, ४ लाख ५० हजारांहुन अधिक मुद्देमाल हस्तगत

अवैद्य वाळू तस्करी करणारा ट्रॅक्टर वडोद बाजार पोलिसांकडून जप्त

सुमित दंडुके/औरंगाबाद : शहरासह जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात अवैद्य वाळू उपसा सर्रास होत असतो, याचे व्रुत्तही वेळोवेळी प्रकाशित केले जाते. मात्र या वाळू तस्करांवर कुठलीही कारवाई होत नाही. मात्र आज वडोद बाजार पोलीस ठाणे अंतर्गत निल्लोड फाटा रोडवर अवैद्यरित्या १ ब्रास वाळूची तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला आहे. तसेच एका आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये एकूण ४ लाख ५० हजारांच्या वाळूसह ट्रॅक्टर आणि ट्रॉली पोलिसांनी जप्त केली आहे.

अशोक तुकाराम गोराडे(रा.निल्लोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबद्दल अधिक माहिती अशी, वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सय्यद आरेफ आणि संतोष डोंगरे हे रात्रगस्तीवर होते. दरम्यान निल्लोड फाटा रोडवर आज पहाटे ५ वाजेला त्यांना एक ट्रॅक्टर अवैद्यरित्या वाळूची तस्करी करताना आढळला. त्यांनी ट्रॅक्टर अडवून तपासणी केली असता त्यात १ ब्रास अवैद्य वाळू आढळली. त्यांनी तात्काळ आरोपी अशोक आणि ट्रॅक्टर ताब्यात घेऊन वडोद बाजार पोलीस ठाण्यात आणले. सदरील आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

वडोद बाजार पोलीस ठाण्यात नुकताच पदभार स्विकारलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सय्यद आरेफ आणि संतोष डोंगरे यांनी सदरील कारवाई यशस्वी पार पाडली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.