हिंगोली ऐतिहासिक दसरा महोत्सवाबाबत महत्वपूर्ण निर्णय.

1 min read

हिंगोली ऐतिहासिक दसरा महोत्सवाबाबत महत्वपूर्ण निर्णय.

जिल्हाधिकाऱ्यांनी रुचेश जयवंशी यांचे सूतोवाच.

प्रद्युम्न गिरीकर/हिंगोली: हिंगोली येथील 180 वर्षांपेक्षा अधिक परंपरा असणारा ऐतिहासिक दसरा महोत्सव यावर्षी रद्द होणार असल्याचे सुतोवाच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
प्रसिद्ध संत खाकीबाबा यांच्या संकल्पनेतून हिंगोली येथे दसरा महोत्सवाला सुरुवात झाली. शहरातील रामलीला मैदानावर गेल्या 180 वर्षापासून दसरा महोत्सव आयोजित केल्या जात आहे. स्थानिक नागरिक व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन केले जाते. महोत्सवामध्ये प्रसिद्ध रामलीलेसह भव्य प्रदर्शने, कृषी प्रदर्शने, आकाश पाळणे व लहान-मोठ्या नागरिकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी अनुभवास मिळते.
यावर्षी रामलीला मैदानाच्या सपाटीकरनाचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता. या वर्षी दसरा महोत्सव रद्द करण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. या वृत्तामुळे नागरिकांसह चिमुकल्यांचा देखील हिरमोड झाला आहे.