राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक, काय निर्णय घेणार शरद पवार?

बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व मंत्री उपस्थित राहणार, पक्षाध्यक्ष शरद पवार करणार मार्गदर्शन

राष्ट्रवादीची आज महत्त्वाची बैठक, काय निर्णय घेणार शरद पवार?

मुंबई : राज्यात सध्या सर्वत्रच आरक्षणाचं वातावरण तापलेलं आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचे नेते व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक आज होत आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार व शरद पवार हे नेत्यांना काय मार्गदर्शन करणार, याविषयी अनेकांकडून तर्कवितर्क लावले जात आहेत. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेल आहे.

काही दिवसांपुर्वी शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासुन ते राजकीय घडामोडींपासून दूर होते. आता त्यांची प्रकृती उत्तम असून ते पुन्हा एकदा पक्षाच्या कामात सक्रिय झाले आहेत. त्याच वेळी राज्यात वेगवेगळे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. पदोन्नतीतील आरक्षण, लॉकडाऊन, निधी वाटप अशा मुद्द्यांवरून महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये कुरबुरी आहेत. तर, आरक्षणावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. करोनाचं संकटही राज्यावर अद्याप कायम आहे. लॉकडाऊनचा फटका बसत असल्यामुळं लोकांच्या मनातही अस्वस्थता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. राज्यातील मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातून आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र, आरक्षणाबाबतची पुढील लढाई सुरूच राहणार आहे. त्यामुळं या मुद्द्यावर सरकारची रणनीती काय असावी, याबाबतही पक्षात मंथन होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजच्या बैठकीबाबत माहिती दिली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.