औरंगाबाद अनलॉक संदर्भात आज महत्त्वाची बैठक

परिस्थितीचा आढावा घेऊन घेतला जाणार निर्णय, शहरातील व्यापाऱ्यांसह नागरिकांचे निर्णयाकडे लक्ष...

औरंगाबाद अनलॉक संदर्भात आज महत्त्वाची बैठक

सुमित दंडुके/औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात लॉकडाऊन लावण्यात आले होते. आता ही रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पहिल्या पाच टप्प्यात निर्बंध उठविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन आपत्ती व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावा असे आदेश देण्यात आलेले आहेत. आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मनपा प्रशासक अस्तिक पांडेय यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यात कोणकोणते निर्बंध हटविण्यात येतील याचा निर्णय या बैठकीत घेण्यात येणार आहे.

पॉझिटीव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत असतील तर तो जिल्हा राज्य शासनाने ठरविलेल्या पहिल्या टप्प्यात येईल, त्या जिल्ह्यात कुठलेही निर्बंध असणार नाही, जिल्हा संपूर्ण अनलॉक होईल. औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी २०.३४ टक्के ऑक्सिजन बेड भरलेले होते. तर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५.३८ टक्के इतका होता. याचाच अर्थ शासन निर्णयानुसार औरंगाबाद जिल्हा पहिल्या टप्प्यात येतो पण यासंबंधी निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार स्थानिक प्रशासनाला असणार आहे. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण असा विचार केला तर शहराला जास्त फायदा होऊ शकतो. शहरातील सर्व निर्बंध संपुष्टात येतील. शहराचा पॉझिटिव्हीटी रेट हा फक्त अडीच टक्क्यांच्या आसपास आहे. ग्रामीणमध्ये मात्र कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. त्यामुळे आजच्या होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्या व्यापाऱ्यांचे आणि शहरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

औरंगाबादकरांनो लस घ्या नाहीतर..
मनपा आयुक्तांचा निर्णय, लस घेतली नाही तर होणार दंड..

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.