खासदार इम्तियाज जलील पोलिसांच्या ताब्यात.

1 min read

खासदार इम्तियाज जलील पोलिसांच्या ताब्यात.

मी काल मंदिर उघडण्यास गेलो होतो. तर आज मशीद उघडायला जात होतो -खासदार इम्तियाज जलील

स्वप्नील कुमावत/औरंगाबाद: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे बंद असलेली, धार्मिक स्थळे उघडण्यासाठी एमआयएम आक्रमक झाली आहे. अशातच खा. इम्तियाज जलील मशीद उघडण्यासाठी गेले असता, पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतले. काही वेळात त्यांना जामीनावर सोडण्यात आले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात धार्मिक बंद असताना. खासदार इम्तियाज जलील मशीद उघडण्यास जात असताना त्यांना पोलिसांनी शाहगंज येथे ताब्यात घेतले. लोकांची भावना ही प्रार्थनास्थळे उघडावीत अशी आहे. यामुळे आपण मंदिर आणि मशीद उघडण्याचे लोकांना आवाहन केले. मी काल मंदिर उघडण्यास गेलो होतो. तर आज मशीद उघडायला जात होतो असे खा. जलील यावेळी म्हणाले.
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच पार्श्र्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळ बंद आहेत. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता धार्मिक स्थळ उघडण्याची परवानगी नाही. मात्र दि.2 सप्टेंबर रोजी एमआयएमचे खा.जलील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याचे म्हटले होते.
आम्ही शांततेने नमाज अदा करण्यासाठी जात आहोत. आमच्यासोबत २५ पेक्षा कमी कार्यकर्ते आहेत. फक्त ५-७ मिनिटे द्या आम्ही नमाज अदा करू आणि निघून जाऊ. असे खा. जलील म्हणाले.