औरंगाबाद ग्रामीणमध्ये २८ घरफोड्या व चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश

औरंगाबाद ग्रामीणमध्ये २८ घरफोड्या व चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

सुमित दंडुके/औरंगाबाद : ग्रामीण भागात घरफोडी करून धुमाकुळ घालणाऱ्या टोळीला अटक करण्यात औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाला यश आले आहे. टोळीतील २ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी एकूण २८ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडुन तब्बल ३ लाख ६३ हजार ४३ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संजय मारोती शिंदे(वय.२९, रा.नाजेपाटी,भोकरदन) आणि रामाअण्णा पवार(वय.२६, रा.पुखराजनगर,भोकरदन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी जिल्ह्यातील खुलताबाद हद्दीत ६, गंगापूर ४, पिशोर २, फुलंब्री २, वडोदबाजार २, चिकलठाणा २, देवगाव २, करमाड २, कन्नड, सिल्लोड, पैठण, वैजापूर, शिऊर, सोयगाव हद्दीतील प्रत्येकी १ असे एकूण २८ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या दोघांविरुद्ध जालन्यात देखील दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय यांच्या टोळीत आणखी काहीजण सहभागी असण्याची शक्यता पोलिस अधीक्षक गोयल यांनी व्यक्त केली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. तेथे यासंबंधी माहिती देण्यात आली.

आई-वडीलही अट्टल गुन्हेगार
अटकेतील आरोपी रामा पवारची आई मंगळसूत्र चोर, तर वडील अट्टल चोर आहे. आई, नातेवाईक महिलांसह एस.टी. बसप्रवासात महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत, मंगळसूत्र चोरी करते. पर्सची चेन उघडून दागिने आणि पैसे चोरी करते. त्यांच्या जिवावर रामा पवार आणि त्याचे साथीदार घरी बसून आरामाने राहात. लॉकडाऊन काळात बस बंद झाल्याने रामा आणि त्याच्या साथीदारांनी घरफोड्या करण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांनी सांगितले.

३ लाख ६३ हजारांचा ऐवज जप्त
चोरट्यांनी गुन्ह्याची कबुली देताना चोरलेला सुरुवातीला ऐवज सहा जणांत वाटून घेतल्याचे सांगितले. यापैकी अटकेतील आरोपींच्या हिश्श्याला आलेले ३ लाख ३० हजारांचे सोन्याचांदीचे दागिने, रोख १४ हजार रुपये आणि २ मोबाइल आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेले कटर जप्त करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निमित गोयल, अपर पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोउपनि विजय जाधव, प्रदीप ठूबे, पोह नामदेव सिरसाठ, संजय देवरे, विठ्ठल राख, बालू पाथ्रीकर, श्रीमंत भालेराव, किरण गोरे, पोना वाल्मीक निकम, राहूल पगारे, शेख नदीम, शेख अख्तर पोकॉ बाबासाहेब नवले, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.