दिल्लीत कोरोनाने धारण केले विध्वंसक रूप

1 min read

दिल्लीत कोरोनाने धारण केले विध्वंसक रूप

पुन्हा निर्बंध कडक, नियमांचे पालन काटेकोरपणे, पुन्हा पोलीस रस्त्यावर, इतर राज्यांनाही सतर्कतेचा इशारा..

सुमित दंडुके / भारताची राजधानी दिल्लीमध्ये सध्या कोरोनाचे विध्वंसक रूप बघायला मिळत आहे. दिल्लीमध्ये नवीन रुग्णांची व मृत्यूंची संख्या वाढली आहे. फक्त दिल्लीमध्ये गेल्या १५ दिवसांत सुमारे १४०० पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ५,८७९ नवीन रुग्णांची वाढ झाली असून तब्बल १११ रूग्णांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत दिल्लीची एकुण रूग्णसंख्या ५ लाख २३ हजार ११७ इतकी झाली आहे.
दिल्लीतील कोरोनाची भयानक परिस्थीती बघता आता इतर राज्यांनीही सतर्क राहण्याची गरज आहे.