परभणीत आज १६६ व्यक्ती कोरोनाबाधीत, रात्रीची संचारबंदी लागू

जिल्ह्यात आजपासून संध्याकाळी ७ ते सकाळ ६ पर्यंत संचारबंदी,शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

परभणीत आज १६६ व्यक्ती कोरोनाबाधीत, रात्रीची संचारबंदी लागू

विजय कुलकर्णी/परभणी: शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत तब्बल १६६ व्यक्ती कोरोनाबाधीत आढळल्या आहेत.  ७१ कोरोनामुक्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.रुग्णालयातील कक्षात ६७२ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ३४७ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ९ हजार ९३७ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ८ हजार ९१८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ४५ हजार ५६३ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ३५ हजार ४६ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ९ हजार ७८४ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, ५९३ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.

*जिल्ह्यात आजपासून संध्याकाळी ७ ते सकाळ ६ पर्यंत संचारबंदी*कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १९ ते २५ मार्चपर्यंत संध्याकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज जारी केले.

*शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी*जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी  मुगळीकर यांनी जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश  जिल्ह्याच्या हद्दीत १६ मार्च रोजी सकाळी ७ वाजेपासून ते ३१ मार्चच्या रात्रीपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीची प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा, अंत्ययात्रा, विवाह, अधिकारी- कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

रुग्णालयातील कक्षात ६७२ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ३४७ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत ९ हजार ९३७ कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी ८ हजार ९१८ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रुग्णालयातर्फे आतापर्यंत १ लाख ४५ हजार ५६३ व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात १ लाख ३५ हजार ४६ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर ९ हजार ७८४ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह, ५९३ अनिर्णायक व १४० नमुने नाकारल्या गेले असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी प्रसिध्द केलेल्या प्रेसनोटद्वारे कळविले आहे.

*जिल्ह्यात आजपासून संध्याकाळी ७ ते सकाळ ६ पर्यंत संचारबंदी*कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १९ ते २५ मार्चपर्यंत संध्याकाळी ७ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आज जारी केले.

*शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी*जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी  मुगळीकर यांनी जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश  जिल्ह्याच्या हद्दीत १६ मार्च रोजी सकाळी ७ वाजेपासून ते ३१ मार्चच्या रात्रीपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. व्यक्तीची प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश धार्मिक सभा, अंत्ययात्रा, विवाह, अधिकारी- कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.