पॉर्नोग्राफी प्रकरणात, राज कुंद्राच्या अडचणीत वाढ

पोलिसांना राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये सापडले गुप्त कपाट

पॉर्नोग्राफी प्रकरणात, राज कुंद्राच्या अडचणीत वाढ

मुंबईः पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा यांच्याशी संबंधित अश्लील प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. राज कुंद्रा याच्या अडचणीत चांगलीच वाढ होतच आहे. कंपनीचे चार कर्मचारी हे साक्षीदार बनले आहेत. त्यामुळे आता राज कुंद्रा विरोधात मुंबई क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलकडे महत्त्वाचा दुआ हाती लागला आहे. इतकंच नाही तर राज कुंद्रानं दीड वर्षात पॉर्न फिल्म म्हणून सुमारे २० कोटी रुपये कमवले याचा सुद्धा तपासात उघड झाले आहे.

अंधेरी येथील राज कुंद्राची कंपनी विआन इंडस्ट्रीज आणि जेएल स्ट्रीमच्या ऑफिसमध्ये क्राइम ब्रांचला एक गुप्त कपाट सापडले आहे. या कपाटातून पोलिसांनी काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याचे बोलले जात आहे. त्याच कपाटात बॉक्स फाईली होत्या. ज्यात क्रिप्टो करन्सी संदर्भातील माहिती होती. म्हणजेच राज कुंद्रा क्रिप्टो करेंसी म्हणजेच डिजिटल पैशांमध्ये सुद्धा व्यवहार करत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पॉर्न फिल्म बनवून कमावलेले पैसे हे केंरीन कंपनीला पाठवले जायचे मात्र केंरीन कंपनीतून ते पैसे एका विशिष्ट माध्यमातून पुन्हा राज कुंद्राला भेटायचे. हे पैसे कुठच्या मार्गाने येत होते याचा तपास प्रॉपर्टी सेलकडून केला जातोय.

राज कुंद्राच्या ऑफिसची झडती घेण्याआधी पोलिसांनी शिल्पा आणि राजच्या जुहू येथील घराचीही झडती घेतली होती. यावेळी पोलिसांनी शिल्पाची तब्बल ६ तास चौकशी करून तिचे स्टेटमेंट लिहून घेतल्याचे बोलले जात आहे.

काय म्हणाली शिल्पा शेट्टी

हॉटशॉट्सवर प्रसारित करण्यात आलेले व्हिडिओ हे पॉर्न नाही तर एरॉटिका व्हिडिओ असल्याचे तिने म्हटले आहे. पॉर्न आणि एरॉटिका दोन्हीमध्ये फरक असतो आणि पोलीस ज्या कंपनीबद्दल बोलत आहेत ही कंपनी राज कुंद्रा नाही तर त्याच्या बहिणीचा नवरा चालवत असल्याचंही तिने सांगितलं. या सर्व प्रकरणात आपला कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचं शिल्पाचं म्हणणं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.