जिल्हा नियोजन समिती मध्ये देशमुख गटाने केली निलंगेकर गटावर कुरघुडी

नवख्या संधी देत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले

जिल्हा नियोजन समिती मध्ये देशमुख गटाने केली निलंगेकर गटावर कुरघुडी

माधव पिटले/ निलंगा : लातूर जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या समितीच्या शासनाने निवडलेल्या समिती निलंगेकर समर्थकांना डावलून विद्यमान पालकमंत्र्यांनी एक प्रकारे निलंगेकर गटावर कुरघुडी केली आहे.या निवडीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिनही नवख्यांना संधी देत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले आहे यामुळे अनेक जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

जिल्ह्यातील वेगवेगळ्या योजनेसाठी आर्थिक बळ देणे व योजनेसाठी या निधी देण्याबाबतची जिल्हा नियोजन समिती म्हणून अत्यंत महत्त्वाची समिती म्हणून जिल्हा नियोजन समितीकडे पाहिले जाते या समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध विकास कामासाठी चा निधी खेचून आणून आपल्या भागातील कामाचा विकास करण्यासाठी ही समिती अतिशय महत्त्वाची आहे या कमिटीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून केंद्रीय मंत्री शिवराज शिवराज पाटील चाकूरकर माजी मंत्री दिलीपराव देशमुख स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्ती होत असत मात्र निलंगा विधानसभा मतदारसंघांमध्ये देशमुख यांनी राजकारणाला सुरुवात केली असून आपले पाय रोवत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेले अभय साळुंके यांना पक्षात प्रवेश देऊन समांतर यंत्रणा उभी करण्यासाठी सुनियोजित केली जात आहे म्हणून त्यांना अभय साळुंके यांना नियोजन समिती मध्ये स्थान देण्यात आले आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे शिवसेनेचे लिंबन महाराज रेशमे यांनाही नियोजन समितीमध्ये संधी दिल्याने निष्ठावंत शिवसैनिका मध्ये असंतोष पसरला आहे तर ग्रामीण भागातील नागरिक अशी कोणतीही संपर्क नसलेले फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या बरोबर व मंञ्या बरोबर नाळ असलेले सुरज चव्हाण यांची निवड समितीमध्ये वर्णी लागल्याने राष्ट्रवादीच्या पोटात जुन्या निष्ठावंता मध्ये नाराजीचा सूर उमटत आहे अभय साळुंके यांची निवड केली असली तरी त्यांना निलंगेकर गटाचे आवाहन स्वीकारावे लागणार आहे राष्ट्रवादी मधून शिवसेनेत प्रवेश केलेले लिंबन महाराज यांचा ग्रामीण भागातील लोकांचा संपर्क असला तरी पदाधिकाऱ्यांकडून मात्र त्यांच्या नावाला विरोध आहे त्यामुळे त्यांनाही पक्षातील अंतर्गत गटबाजीला सामोरे जावे लागणार आहे.

जिल्हा नियोजन नियोजन समितीवर निष्ठावंतांना डावलून त्यांना पक्षाने संधी दिल्याने त्या त्या पक्षातील कार्यकर्त्यांत नाराजी पसरल्यामुळे संभाव्य येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीमध्ये याचे पडसाद उमटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.