शेवटी जो परिणाम व्हायचा तो झालाच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे HN रिलायन्स हाँस्पिटलमध्ये रुग्णालयात उपचार घेणार.

शेवटी जो परिणाम व्हायचा तो झालाच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल झाले आहेत. दोन ते तीन दिवस ते रुग्णालयात उपचार घेणार आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्याबाबतची माहिती दिली आहे.

गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच अशा शब्दात मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंनी त्यांच्यावरील शारिरीक त्रासाबद्दल सांगितले आहे.

पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीने डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी रुग्णालयात दाखल होणार असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे.यानिमित्ताने एकच सांगायचे आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.