बँका बंद असल्याने खातेदारांची गैरसोय

संचारबंदीमुळे बँकांचे व्यवहार होत नाहीत.

बँका बंद असल्याने खातेदारांची गैरसोय

परभणी: येथील जिल्हा मध्यवर्तीसह भारतीय स्टेट बँका काही दिवस संचारबंदी तर काही सुट्ट्या आल्याने बंदच आहेत. यामुळे खातेदारांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसुन येत आहे.

सध्या संचारबंदीमुळे बँकांचे व्यवहार होत नाहीत. तसेच शनिवार ते सोमवार बँक बंद तर १ एप्रिलपर्यंत संचारबंदी आहे. त्यामुळे बँका बंद राहणार असल्याने खातेदारांची मोठी गैरसोय झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी 7 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. परंतु शासकीय कार्यालयांना कामकाजासाठी मुभा देण्यात आली. परंतु बँकेत अंशत: व्यवहार होणार असल्याने ग्राहकांची कुचंबना झाली. २५ मार्च रोजी दुपारी बँकेला कुलूप आढळून आले. तर २६ मार्च रोजी बँकेचे गेट उघडे ठेऊन फक्त कर्जमाफीचे अर्ज घेत होते. यामध्ये दुग्ध व्यवसायासह अनेक व्यावसायिकांना अडचण निर्माण झाली आहे. त्यातच मार्च एण्ड असल्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. देवाण-घेवाण बंद असल्याने यामुळे खातेदारांची गैरसोय झाल्याचे चित्र आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.